farmers will agitate if there is no water on the same judicial system
farmers will agitate if there is no water on the same judicial system 
पुणे

पाण्याच्या वादातून शेतकरी आंदोलन उभे राहण्याची चिन्हे; नीरा डावा कालवा संघर्ष समितीचा इशारा

मिलिंद संगई

बारामती : नीरा डावा कालव्याचे बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील समान न्याय तत्त्वावर पाणी मिळाले नाही तर तिन्ही तालुक्यातील शेतकरी आंदोलन उभे करतील, असा इशारा आज नीरा डावा कालवा संघर्ष समितीच्या वतीने दिला गेला.
 
आज तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी (ता. 24) प्रशासकीय इमारतीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शेतकरी करणार आहेत. मुंबईला जाऊन वरिष्ठ मंत्र्यांना भेटून या बाबत तोडगा काढण्याची विनंती केली जाणार आहे, यातून मार्ग निघाला नाही तर न्यायालयात धाव घेण्याचे आज बारामतीत झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले.
 
तहसिलदार विजय पाटील यांना आज निवेदन देण्यात आले. यापूर्वी नीरा कॅनॉल संघात झालेल्या बैठकीत वसंतराव घनवट, राजेंद्र ढवाण पाटील, सतीश काकडे, कुलभूषण कोकरे, अमरसिंह जगताप, राहुल तावरे, बाळासाहेब देवकाते, पोपटराव तुपे, बाबूराव चव्हाण, भारत गावडे, संदीप चोपडे, सचिन सातव, मदनराव देवकाते, अॅड. नितीन कदम यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षीय मतभेद बाजूला सारुन बारामती, इंदापूर व पुरंदर या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत या प्रश्नावर लढा उभा करण्याचे आज निश्चित करण्यात आले. 
निवेदनात काय नमूद आहे.

•    नीरा देवधर धरणाचे पाणी सध्या विकसीत लाक्षक्षेत्रास दिल्यानंतर उर्वरित पाणी समान न्याय पध्दतीने नीरा उजवा व डावा कालव्यास मिळावे
•    2005 च्या कायद्यान्वये समन्याय पध्दतीने नीरा डावा कालव्याचे शिल्लक 1.85 टीएमसी पाणी मिळावे
•    नीरा देवधर व खडकवासला दोन्ही धरणांचे पाणी नीरा डावा कालव्यासाठी मिळणार नसल्याने उन्हाळी दोन आवर्तने मिळणार नाहीत, पर्यायाने शेतक-यांना आत्महत्या कराव्या लागतील
•    या मुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न बिकट होईल, पशुधन व दुग्धव्यवसायावर विपरीत परिणाम होईल.
•    नीरा डावा कालव्यावरील पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून ग्रामस्थांना फटका बसेल
•    या पाण्यावर आधारित अनेक लघुव्यवसाय अडचणीत येतील, अर्थकारणावर विपरीत परिणाम होईल
•    अवर्षण तालुक्यांचे पाणी बंद करुन शेतकरी अधिकच अडचणीत येईल

तर आत्महत्याशिवाय पर्यायच नाही...
नीरा डावा कालव्याची दोन आवर्तने कमी झाली तर या पाण्यावर अवलंबून कृषी अर्थकारणाचा कणाच मोडून जाईल, शेतकऱ्यांना अशा स्थितीत आत्महत्येशिवाय मार्गच राहणार नाही, अशी भावना सर्वच शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT